लोकांनी सतर्क रहावे- जगतसिंग गिरासे

उल्हासनगर :- कोरोना वायरस च्या उद्रेका बाबत बोलताना जगतसिंग गिरासे यांनी विभागातील लोकांनी सतर्क राहून आपले दैनंदिन कामे करावी आणि अधिक लोकांनी एकत्र न येता एखादे कार्य उरकावे असे मत व्यक्त वेले आहे. कोरोना वायरसचे संक्रमण संपर्का मुळे होत असून आपला संपर्क सतर्क राहून लोकांशी करावा असा सल्ला गिरासे यांनी दिला आहे. हस्तां दो लन सारखे प्रकार टाळावेत, तसेच ज्या ठिकाणी अनेक लोकांचे हात लागतात त्या ठिकाणी स्पर्श झाल्यास काही वेळाने अल्कोहल युक्त सोप हैंडवॉश वपरून आपले हात स्वच्छ धुवावेत असे मत गिरासे यांनी व्यक्त केले आहेत. लोकांनी भीति न बाळगता या वायरस शी लढा देणे आवश्यक आहे आणि तरच ही लढाई आपण जिंकणार असे सुद्धा ते म्हणाले. येत्या महिन्याभरात योग्य खबरदारी घेतल्यास हा वायरस आपल्या देशातून नक्की नष्ठ होईल असा विश्वास जगतसिंग गिरासे यांनी व्यक्त केला आहे.