"डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा पुरस्कार' जाहीर

अंबरनाथ दि. १३ प्रतिनिधी :- परिवर्तन; एक लोक चळवळीचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा पुरस्कार" उल्हासनगर येथील आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शारदा आंभोरे यांना जाहीर झाला असून तो १५ मार्चला चळवळीच्या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आंभोरे म्याडम गेली दोन दशके सार्वजनिक जिवनात कार्यरत असून त्यांनी महिलावरील अन्याय अत्याचार या विरोधात जसा आवाज उठवला तसाच त्या महिला रोजगार या विषयी कायम प्रयत्नशील राहिल्या आहेत. ____ त्यांना नेहरु युवा केंद्राचे सांस्कृतिक युवा मंचात सहभाग घेतल्याबद्दल २००५ ला प्रमाणपत्र मिळाले. २००५ ला सामाजिक कार्यासाठी आनंदकुमार बोबडे पुरस्कार मिळाला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरी उल्हासनगरच्यावतीने ८ मार्च २०११ रोजी त्यांना गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे. राज्य सरकारने त्यांची २०००८-१३ या कालावधीसाठी “विशेष कार्यकारी अधिकारी' म्हणून निवड केली होती. साप्ताहिक बळीराजाने त्यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान पत्र देवून . गौरविले आहे. उल्हासनगर Tी महानगर पालिका सार्वजनिक आरोग्य विभागने त्यांना प्रशंसा पत्र देवून गौरविले आहे. मीटकॉनचे व्यवसायभीमुक प्रशिक्षणही त्यांनी पुर्ण केलेले आहे. ह्युमन वेल्फेअर सोशल ऑर्गनायझेशनचा राज्यस्तरीय फेलोशिप परस्कार राज्यस्तरीय फेलोशिप पुरस्कार २००५ त्यांना मिळालेला आहे. लोकमत सखीचे उत्तम प्रतिनिधीत्व केल्याचे प्रमाण पत्रही त्यांना मिळालेले आहे. २०१८ चा कमलानी नाका कला मंचाचा ज्ञानज्योती सावित्रीमाई प पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.