'सोलो ट्रिप'कडे तरुणींचा वाढता कल

काही वर्षांपूर्वी अवघड वाटणारी ही गोष्ट आता सर्रास होताना दिसतेय. सोलो ट्रिपला जाणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. या ट्रिपमध्ये काही ना काही साहसी गोष्टी करुन बघण्याला तरुणींची पसंती मिळतेय.आपण सध्या ज्या समाजात राहतो तिथे स्त्रियांनी सोलो ट्रिपला जाणं हेच त्यांच्यासाठी एक साहस आहे. कारण आपल्याकडे त्यांच्या काळजीपोटी त्यांना सोलो किंवा अॅडव्हेंचर ट्रिपला जाण्यापासून परावृत्त केलं जातं. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र थोडं बदलतंय. तरीही यात आणखी बदल व्हायला हवेत. सोलो ट्रिपमुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होतेच. पण त्याचबरोबर त्या आणखी जबाबदार आणि समजूतदारही होतात.’आपल्याकडील अशा अनेक मुलींना परिवाराकडून प्रोत्साहन मिळत नसल्यानं त्यांना साहसी खेळांमध्ये भाग घेता येत नाही. म्हणूनच सध्या अनेक तरुणी-महिला सोलो ट्रिपला जाण्याला अधिक पसंती देताना दिसताहेत.